महाविकास आघाडीचा धक्का : देशमुखांसह मलिकांना मतदानास न्यायालयाची मनाई

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । मुंबई उच्च न्यायालयाकडून महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. विधान परिषद निवडणूकीत मतदान करण्यास माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना परवानगी नाकारली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषद निवडणूकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणूकीत मतदान करू देण्याची अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने दोघांचे मागणीचे अर्ज फेटाळून लावले आहे. मतदानासाठी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी मागितली होती.

येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी बंधपत्रावर एक दिवसाचा जामीन मंजूर करण्याची मागणी देशमुख-मलिक यांनी याचिकेद्वारे केली होती. दोघांना अद्याप त्यांच्यावरील आरोपांवर दोषी ठरवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही, असेही युक्तिवादाच्या वेळी दोन्ही नेत्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. तसेच दोघांना मतदानासाठी परवानगी देण्याचा विशेषाधिकार न्यायालयाला असल्याचा दावाही करण्यात आला होता.

 

Protected Content