Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीचा निर्धार (व्हिडीओ)

पाचोरा – नंदू शेलकर |  खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या  विराट सभेसाठी पाचोरा –  तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सह शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सहभागी होण्याचा शासकीय विश्राम गृहात निर्धार करण्यात आला.

 

खासदार राहुल गांधी यांच्या शेगाव येथे येणाऱ्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पाचोरा तालूका काॅंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते माजी आ. दिलिप वाघ, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी सह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, रणजीत पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख पदाधिकारी अरुण पाटील, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख शरद पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कुसुम पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील, मुकेश तुपे, गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड. अंबादास गिरी, तालुका एस.सी. सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, अजबराव काटे, रवींद्र महाजन, अमरसिंग पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, अतुल चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पाचोरा शहर आणि ग्रामीण भागातील जनतेने सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी च्या नेत्यांनी सामुहिक आवाहन केले आहे. शेगाव जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्याशी दि. १४ नोव्हेंबर पर्यंत संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले.

Exit mobile version