Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोर्‍यात महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथे दि. १ नोव्हेंबर रोजी पाचोरा येथील जवळपास ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित असलेल्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचा विषय आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पूर्णत्वास आले असून आ. किशोर पाटलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाचोरा येथे रेल्वे स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महात्मा ज्योतिबा फुले स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी २० लाख रुपयांचा निधी आमदार किशोर पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून दिला आहे. आमदार किशोर पाटील यांनी स्मारकाचा विषय मार्गी लावल्याने सर्व माळी व बहुजन समाजाच्या वतीने आमदार किशोर  पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात भुमिपुजन सोहळा संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनिल शिंदे यांना देण्यात आले होते.

त्याच बरोबर यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किशोर पाटील यांच्यासह उद्योजक मुकुंद बिल्दीकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, जिल्हा परिषदेचे रावसाहेब पाटील, मार्गदर्शक चिंचोले, संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष जिभाऊ पाटील, माळी समाजाचे श्रीराम महाजन, नगरसेवक विकास पाटील, वासुदेव महाजन, अशोक मोरे, डॉ. भरत पाटील, अजहर खान, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोंगरे, बंडू चौधरी, सुनिल पाटील, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, दिपक आदिवाल, खलील देशमुख, तालुका प्रमुख सुनिल पाटील (जारगाव), संतोष परदेशी, माळी समाज अध्यक्ष संजय महाले, उपाध्यक्ष के. एस. महाजन, चिंधु मोकळ, शरद गिते, कौशल्या लॅबोरेटरीचे संचालक डॉ. गोरख महाजन, बापू महाजन, संतोष महाजन, सुनिल महाजन, कन्हैया देवरे, नाना पंढरीनाथ महाजन, नाना  महाजन, हाॅटेल जय मल्हारचे संचालक राहुल महाजन, अशोक महाजन, युवराज महाजन,

एम. एस. महाजन, डॉ. संजय जाधव, मच्छिंद महाजन, सुधाकर महाजन, आबा महाजन, साहेबराव महाजन, मयूर महाजन, अतुल मालकर, कैलास घोंगडे, एन. बी. महाजन, सुदर्शन सोनवणे, गजानन रोकडे, भास्कर महाजन, संजय महाजन, प्रदीप वाघ, नितीन पाटील यांचे सह माळी समाजाचे विविध नेते, पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संदीप पाटील यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. एस. महाजन यांनी केले. सूत्रसंचलन प्रवीण ब्राह्मणे तर उपस्थितांचे आभार शरद गीते यांनी मानले.

Exit mobile version