महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – लिंगायत समाज संस्थेतर्फे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा कार्यालयात तसेच पत्रकार भवन येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच मिरवणुक काढण्यात आली.

लिंगायत समाजाचे समतानायक, समाजसुधारक, क्रांतिसूर्य, जगतज्योती, परमपूज्य श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका कार्यालयात म.बसवेश्र्वर यांच्या प्रतिमेसं माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा पत्रकार भवन येथे भाजपा आ. सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर महात्मा बसवेश्र्वर महाराज याच्या प्रतिमेची मिरवणुक बळीराम पेठ, टावर चौक, चिञा चौक, छ.शिवाजी महाराज चौक, नेहरुचौक, स्टेशन रोड मार्गे पञकार भवन येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

यावेळी बसवेश्र्वर जयंतीचे आयोजक तथा लिंगायत समाजाचे अध्यक्ष संदिप वाणी, ज्ञानेश्र्वर बारसे, सचीव संदिप मिटकरी, समिर गुळवे, उपाध्यक्ष गजानन आकाशे, विशाल लिंगायत, संतीष आंबेकर, राजेश ज्ञाने, अरुण कस्तुरे
, सुभाष गुळवे,  सुरेश तोडकरी, छगन पतंगपुरे, सोमनाथ पतंगपुरे, अभय खांदे, प्रमोद कुल्ली, देवेंद्र कापसे, गोविंद खांदे, उमेश नष्टे, सतीश ज्ञाने, संजय बसवे, लिंगायत समज भगिनी आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!