जळगावात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे शुक्रवार, १० जून रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे गीत वाजवण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्वीकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. माया आर्वीकर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ.जयंत देशमुख, डॉ.विठ्ठल शिंदे, डॉ.सुरेंद्र गावंडे, डॉ.आलोक कुमार यांच्यासह विद्यार्थी व सुरक्षा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content