Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील ३२ उपकेंद्रावर होणार ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा’ – जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१जळगाव शहरातील एकूण ३२ उपकेंद्रावर २६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फक्त परीक्षार्थींनाच प्रवेश राहील, अशा आशयाचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे की, “या परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. या परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, खबरदारीचे उपाय म्हणून फौजदारी प्रक्रियानुसार मिळालेल्या अधिकारानुसार पुढील प्रमाणे आदेश देत आहे.

त्यानुसार दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जळगाव शहरातील एकूण ३२ उपकेंद्राचे १०० मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदर आदेश परीक्षेचे दिवशी सकाळी ८ वाजेपासून ते पेपर रवाना होईपर्यंत प्रत्येक उपकेंद्रावर ३ पुरुष व २ महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्त तैनात करावा. तसेच परीक्षा केंद्राजवळच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन / एस.टी.डी/ आय.एस.डी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version