Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात मोदींसह भाजपा नेत्यांचा प्रचाराचा धडाका; 60 दिवसांत तब्बल 1 हजार सभा

amit shah

 

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख भाजपा नेते सभा तब्बल एक हजार जाहीर सभा तसेच रोड शो करणार आहेत. यासंदर्भातील माहिती भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

केशव उपाध्ये यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा येथे सकाळी होणार असून त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 तारखेला कोल्हापूरात प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्याही 75 पेक्षाही अधिक सभा या राज्यात होतील. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रचारसभामध्ये सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असूनही ते महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील या नेत्यांशिवाय राष्ट्रीय पातळीवरील भाजपा नेते देखील प्रचार सभा घेणार आहेत, असे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

Exit mobile version