Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडीच्या राज्यव्यापी संपास प्रारंभ

मुंबई प्रतिनिधी | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी संपास प्रारंभ झाला आहे. आज दिवसभरात तिन्ही घटकपक्षांतर्फे ठिकठिकाणी निदर्शने केली जाणार आहेत. या बंदला नेमका कसा प्रतिसाद लाभला हे. येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पाळण्यात येत आहे. या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांसह भाजपविरोधातील सर्वच पक्ष, संस्थांसह विविध कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बंद परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने केले आहे. डावे पक्ष, संघटना, कामगार संघटना या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टीनेही बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, आजच्या बंदमधून रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणा आणि सार्वजनीक वाहतूक सेवेला बंदमधून वगळण्यात आले आहे. याचा अपवाद वगळता सर्व बाबी बंद राहणार आहेत.

Exit mobile version