Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रपुरुषांची बदनामी थांबवा, अन्यथा आंदोलन;राजे प्रतिष्ठाणचा इशारा

universal news

धरणगाव प्रतिनिधी । जय भगवान गोयल नामक विकृत माणसाने “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच पिंपरी चिंचवडच्या महापौर उषाताई ढोरे यांनी क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले  आहे. याच्या निषेधार्थ आज येथील ‘राजे प्रतिष्ठाण’ तर्फे सनदशीर मार्गाने पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रपुरुषांची बदनामी थांबवली, नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, १२ जानेवारी २०२० रोजी दिल्ली भाजपा कार्यालयात भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी शाम जाजू, माजी खासदार महेश गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जय भगवान गोयल लिखित “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अशा प्रकारचे वादग्रस्त पुस्तक प्रकाशित करून नरेंद्र मोदी यांची तुलना क्षत्रियकुलवंतास, राजाधिराज, बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केली आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अतिशय जाणीवपूर्वक असे प्रकार याआधीही केले गेले आहेत.

 

नुकताच झालेल्या ३ जानेवारीच्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवडच्या महापौर उषाताई ढोरे यांनी क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले. ठराविक मानसिकतेच्या लोकांकडून असे प्रकार करून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. आजच्या निमित्ताने तमाम शिवप्रेमींनी सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण केले. महापुरुषांच्या घोषणांनी शिवरायांच्या स्मारका जवळील परिसर दणाणून निघाला. तद्नंतर सर्व शिवप्रेमी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये जमलेत. धरणगाव पो.स्टे.चे एपीआय पवन देसले साहेबांना निवेदन देण्यात आले. असे अनुचित प्रकार थांबले पाहिजे, महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या लोकांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांना चांगलीच अद्दल घडली पाहीजे अशा प्रकारची मागणी शिवप्रेमींच्या वतीने लक्ष्मण पाटील यांनी केली.

 

यावेळी धरणगावातील तसेच परिसरातील सावता माळी ग्रुप, टायगर ग्रुप, एस. टी. एम. ग्रुप, राजे छत्रपती ग्रुप, शिवजयंती उत्सव समिती, जय हिंद ग्रुप, जय बजरंग मित्र मंडळ, राजमुद्रा कन्स्ट्रक्शन, राजे छत्रपती ग्रुप बिलखेडा, छत्रपती ग्रुप बांभोरी या सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी निवेदन सादर करतांना राजे प्रतिष्ठाण धरणगाव चे तालुकाध्यक्ष वैभव पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, तालुका संघटक त्रंबक पाटील, तालुका कार्याध्यक्ष ललित मराठे, सोशल मिडिया प्रमुख तसेच शिवव्याख्याते ललित पाटील, तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील, शहर सचिव दिनेश भदाणे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सिताराम मराठे, भिमराज पाटील, बंटी महाजन, नामदेव मराठे, जितू महाराज, चेतन पाटील, मेघराज पाटील, पवन भदाणे (बिलखेडा), मोहन मराठे, कैलास पाटील, दिनेश पवार, पंकज सपकाळे, दीपक जयराम पाटील, दिनेश पवार, वैभव वानखेडे (बांभोरी), जगदीश जगताप (बांभोरी), विक्रम पाटील, वैभव पाटील, सागर वाजपेयी, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, घनश्याम पाटील, शुभम मराठे, सुमित मराठे, विशाल चौधरी, भिमराज धनगर, मोहनिश चंदेल, रोहन मराठे, गौरवसिंग चव्हाण, शिवा महाजन, गोपाल मराठे, रितेश मराठे, मुकेश पाटील, महेश पाटील, राजेंद्र ठाकूर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version