Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेगावात संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त महापूजा

शेगांव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आज श्री संत गजानन महाराजांच्या 144 व्या प्रगट दिनानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान मंदिरात दुपारी महापूजा होणार आहे.

तसेच संतनगरीत होणारा पालखी सोहळा रद्द असून समाधी मंदिराभोवती मोजके उपस्थिती अंतर्गत परिक्रमा होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसरा वर्षी संत गजानन महाराज यांच्या श्रींच्या पालखी सोहळ्याची नगर परिक्रमा होणार नाही, त्यामुळे समाधिमंदिर अंतर्गत परिक्रमा उपस्थित होत आहे. श्री गजानन महाराज शेगाव येथे माग वैद्य सप्तमीला दुपारच्या माध्यान्हीच्या समीयी  प्रगट होते. त्याच वेळी नुसार श्री गजानन महाराज संस्थान मध्ये अंतर्गत पूजाअर्चा होऊन साध्या पद्धतीने श्रींचा प्रगटदिन सोहळा सलग दुसऱ्या वर्षी साजरा होईल प्रकट दिनाचे औचित्य साधून गावाचे वारकरी  पायदळ वारीने भजनी दिंड्या सह भजन येत असल्याचे चित्र आहे.

अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सचिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय राम कृष्ण हरी जय गजानन जय गजानन असलेले भगवा पताकाधारी वारकरी रस्त्याने दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन गजानन महाराज संस्थानच्या वतीने देखील करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आली नाही त्यामुळे नवीन आलेला ओमायक्रोन मुळे  सांस्कृतिक कार्यक्रम परवानगी नाही. परिणामी श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन उत्सव 23 फेब्रुवारी रोजी साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. या दिवशी कुठलाही प्रकारचा मिरवणूक न काढता मंदिराच्या परिसरात नियमानुसार साजरा केला जाणारा आहे. उपस्थित राहण्यासाठी संबंधित व्यक्तींनीची थर्मल तपासणी करण्यात येणार आहे. सोबतच कार्यक्रमात आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे या कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक आहे.

श्रींच्या प्रकट दिनानिमित्त स्ते गर्दीने फुलून गेले बाजारपेठेत मुख्य रस्त्याने तसेच मंदिर परिसरात पूजाविधी मिठाई तसेच इतर साहित्य विक्री दुकाने सजली आहेत. भक्तांच्या आगमनामुळे दुकानदारांच्या चेहर्‍यावरील पुन्हा एकदा आनंद दिसत आहे.

Exit mobile version