Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दसनुर येथे श्रीराम मंदीराच्या बांधकामाची महामंडलेश्वर जनार्दन महाराजांकडून पाहणी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील दसनुर येथे सुरू असलेल्या राम मंदीराचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी भेट देवून पाहणी केली.

 

अयोध्या येथे सुरु असलेले राम मंदीराची आठवण म्हणुन गावात राम मंदीराचे बांधकाम सुरु आहे.दरम्यान काही दिवसा पूर्वी या मंदीराला महामंडलेश्वर प.पु. पुरूषोत्तमदासजी महाराज यांनी देखिल भेट दिली होती.

 

रावेर तालुक्यातील दसनुर येथे राम मंदीरच्या बांधकाम  प्रगतीपथावर सुरु आहे. ग्रामस्थानी लोकवर्गणी करून बांधकाम सुरु करण्यात आले आहे. यासाठी पंचायत समिती सदस्या अनिता चौधरी यांचे पती भाजपा सरचिटनीस महेश चौधरी, नितिन पाटील, अनिल पाटील, मनोज पाटील, विट्ठल पाटील, जगदीश पाटील, बालु महाराज, पोलिस पाटील दिपक पाटील, स्नेहल पाटील,  अशोक पाटील, उदय महाजन, चेतन महाजन, रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, सारंग पाटील, प्रतिक पाटील, वैभव महाजन, नारायण महाजन, योगेश चौधरी, नारायण महाजन, योगेश पाटील, दर्शन पाटील, सुनिल पाटील, राजू अंबलदार, संजू अंबलदार, संजू भोई यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी राम मंदिरासाठी मदत केली आहे.

 

Exit mobile version