Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय कृषीधन प्रदर्शनाला जनार्दन हरीजी महाराजांची भेट

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सुरु असलेले कृषी प्रदर्शन रावेर – यावल तालुक्यातील शेतकर्‍यांना नवीन संशोधन माहिती करून देणारे तर महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रसिद्धी व बाजारपेठ मिळवून देणारे उत्तम माध्यम असून आ. शिरीषदादा चौधरी, धनंजय चौधरी व संस्था परिवाराला याचे श्रेय दिले पाहिजे असे मत प. पु.महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज यांनी व्यक्ती केले.

कृषीधन या प्रदर्शनाच्या तिसर्‍या दिवशीही विविध स्तरातून उत्स्फूर्तपणे भेटी देणार्‍यांचा प्रतिसाद मिळाला. यात प्रामुख्याने आमदार संजय सावकारे ,महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या समवेत वृंदावन धाम आश्रमाचे गोपाल चैतन्यजी महाराज व सावदा गुरुकुलचे प्रमुख स्वामी भक्ती किशोरजी महाराज यांनी भेट दिली.

यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थी,रविवारची सुटी असल्यामुळे नोकर वर्गातील कर्मचारी व शेतकरी,आश्रम शाळा पिंपरी मोहगण येथील ४० विद्यार्थी , वसंतराव नाईक आश्रम शाळा अभोडा येथील पंचवीस विद्यार्थी ,यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन बचत गटाकडून नवनवीन वस्तू खरेदी केल्या व नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली.

दरम्यान, सदर कृषी प्रदर्शनाला पांडुरंग दगडू सराफ , मिलिंद वाघुळदे ,डॉ. आशिष सरोदे डॉ.स्वप्नील चौधरी, लीलाधर चौधरी भालोद, डॉ नितीन महाजन फैजपूर, डॉअतुल सरोदे व डॉ.प्रियदर्शीनी सरोदे, निलेश राणे, चिनावल येथील प्रगतीशील शेतकरी संजीव महाजन , मुस्तकीम मेंबर, संजय गाजरे ,केतन किरंगे फैजपूर ,खानापूर येथील प्रगतीशील शेतकरी राजू बोंडे, पंडितराव कोल्हे, कॉन्ट्रॅक्टर बाळू महाजन , पप्पू चौधरी, हिंगोणा येथील माजी सरपंच महेश राणे ,नवलसिंग लोंढे, गोपाळ गाजरे ,बाळू चौधरी, अरमान तडवी यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसा केली.

Exit mobile version