Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाआवास अभियानअंतर्गत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा

 

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महाआवास अभियान- ग्रामीण’ राबविण्याबाबत शुक्रवार 3 डिसेबर रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

‘सर्वासाठी घरे’ या केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महाआवास अभियान- ग्रामीण’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरीकांनी ऑनलाईन आयोजित केलेल्या जिल्हास्तीय कार्यशाळेला उपस्थिती द्यावी असे आवाहन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे.

Exit mobile version