Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवा नेते मंगेश चव्हाण यांचा नागरीकांकडून सत्कार

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये रविवारी सायंकाळी जामा मज्जीद जवळ झालेल्या कार्यक्रमात युवा नेते मंगेश चव्हाण यांनी केलेल्या सामाजिक कार्या बद्दल गौरव करण्यात आला. अहमद बाबा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समाजहीत जोपासणारे व नेहमी सामाजिक कार्यात पुढे असणारे युवा नेते मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी भोगा शेख, इरफान कुरेशी, मेहबूब शेख, बब्बू शेख, गफ्फुर पैलवान, गुलबाज पैलवान यांच्या सह माजी नगर सेवक प्रभाकर चौधरी, शांताराम पाटील, संजय पाटील, अकलाक शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफीक शेख यांनी तर आभार दाऊद शेख यांनी मानले.

Exit mobile version