Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्य प्रदेशातील तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

suside

 

जळगाव प्रतिनिधी | मुंबईहून आपल्या गावी परतणाऱ्या मध्य प्रदेशातील तरुणाचा रेल्वेतून पडून निंभोरा रेल्वे स्थानकाजवळ जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडलीय. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

याबाबत माहिती अशी की, विनीत त्रिवेणी प्रसाद (वय 29 रा. नगर वार्ड क्रमांक ३, पुष्पराज नगर ता. हुजूर जि. रीवा, मध्यप्रदेश) हा सराफचे काम करत होता. त्याचे काम बंद पडल्यानंतर नवीन कामाच्या शोधासाठी तो मुंबईला गेला होता. मुंबईहून काशी एक्सप्रेसने घरी परत जात असताना निंभोरा रेल्वे स्थानकाजवळ अचानक तोल जाऊन पडला. त्यात विनीतचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली.

सुरुवातीला अनोळखी म्हणून भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर आधारकार्डच्या सहाय्याने विनीत प्रसादची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधून आज सकाळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकाँ त्रंबक वाघ आणि पो. कॉ. नरेंद्र लोहे करीत आहे.

Exit mobile version