Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा येथे माधुरी पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

WhatsApp Image 2019 10 04 at 5.28.00 PM

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील माधुरी किशोर पाटील यांनी आज (दि. ४) रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडे दाखल केला आहे.

विधानसभा मतदार संघासाठी आज शेवटची मुदत असल्याने अनेकांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. मधुरी पाटील यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत  अर्ज दाखल केला होता. त्यांचे पती जळगाव महापालिकेत नगरसेवक होते. त्यांनी कारकीर्द गाजविली आहे. अर्ज दाखल करतांना त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्तेही हजर होते

Exit mobile version