Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसेचा मोदींवर ‘पेपर स्ट्राईक’ ; 56 मार्कांचा पेपर 2 दिवसांत सोडविण्याचे चॅलेंज

नवी मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नसला, तरी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी सभा घेतल्या. दरम्यान, राज ठाकरेंवर भाजपकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसैनिक सरसावले असून राज ठाकरेंच्या प्रचारसभांमधील मुद्द्यांना बळ देण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. मनसेने 56 इंचाची प्रश्नपत्रिका तयार करुन, दोन दिवसात प्रश्नपत्रिका सोडवण्याचे आव्हान भाजप नेत्यांना दिले आहे. दरम्यान,या प्रश्नपत्रिकेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.

 

नवी मुंबई शहर मनसेने प्रकाशित केलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सर्वसामान्य शाळेतील प्रश्नपत्रिकेसारखीच आहे. मात्र, यातील एका वाक्यात प्रश्न, पर्यायी प्रश्न, रिकाम्या जागा भरा, संदर्भासहित स्पष्टीकरण इत्यादी अगदी हटके आहेत. प्रत्येक प्रश्नातून भाजपची गोची होताना दिसतेच, सोबत टोलेही लगावले आहेत. नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे की, आम्ही 56 गुणांची प्रश्नपत्रिका प्रकाशित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजपला दोन दिवसांचा आम्ही अवधी देतो, त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवून दाखवावी. तसेच, आशिष शेलारांना राज साहेबांच्या प्रश्नांना उत्तर देता आले नाही, किमान ही प्रश्नपत्रिका तरी सोडवावी, असे आव्हान दिले आहे.

 

Exit mobile version