Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मु. जे. महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

1

जळगाव, प्रतिनिधी | मु. जे. महाविद्यालयाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभाग तसेच शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणसशास्त्र महाविद्यालय यांच्या विद्यमाने गुरुवार ५ रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. आजची युवापिढी ही उद्याचे भविष्य आहे म्हणून प्रत्येक शिक्षकाने विद्येचे दुधारी शस्त्र हाती घेउन सूज्ञ नागरिक घडवावा असे विचार त्यांनी व्यक्त केले.यावेळी केसीई सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी व जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप केदार, प्रा. प्रशांत सोनवणे, प्रा.केतकी सोनार, संजय जुमनाके, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. निलेश जोशी, प्रा. डॉ. आर. आर. सोनवणे, प्रा. डॉ. एस. डी भंगाळे, के. व्ही. बाविस्कर, व्ही. एम. चौधरी, जे. बी. पाटील, पी. डी.कोल्हे, ए. आर. बन्नापुरे, विद्यार्थी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपास्थित होते.

Exit mobile version