Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : लकी टेलर व जानकीराम पाटील यांचा चंद्रशेखर अत्तरदेंंना जाहीर पाठींबा !

6d4a01cf f6b9 4429 b9a7 cbae1b3078e0

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांनी माघार घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यावेळी लकी टेलर यांच्यासह माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी आपला पाठींबा अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना देत असून उद्यापासून त्यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले. या राजकीय घडामोडींमुळे जळगाव ग्रामीणच्या राजकारणाला जबरदस्त कलाटणी मिळाली असून शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. तर या निमित्ताने अत्तरदेंना अधिकचे राजकीय बळ मिळाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

 

Exit mobile version