Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात लुटमार, मुक्ताईनगरात अटक : टोळके जेरबंद

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर शहरातनजीक असलेल्या एका ठिकाणावरून लुटमार करून पळ काढत असलेल्या टोळक्याला मुक्ताईनगर पोलिसांन जेरबंद केले आहे.

या संदर्भात वृत्त असे की, जामनेर शहरातील एका ठिकाणी सहा जणाच्या टोळीने गावठी कट्टयासह अन्य शस्त्रांचा धाक दाखवून लुट केली. यानंतर ही टोळी बोदवडच्या दिशेने पळाली. लुट झालेला संबंधीत व्यक्ती हा जामनेरातील एका प्रभावशाली व्यक्तीचा असल्याने त्याने तात्काळ याबाबतची माहिती बोदवड पोलिसांनी दिली. त्यांनी अडथळा निर्माण करून त्यांना अटकाव करण्याची तयारी केली. मात्र याआधीच चोरटे बोदवडवरून मुक्ताईनगरकडे पळाले होते.

दरम्यान, बोदवड पोलिसांनी मुक्ताईनगरच्या पोलिसांना तात्काळ याबाबतची माहिती दिली. त्यांनी सापळा रचून सहा जणांचा टोळीला अटक केली असून त्यांच्या कडून शस्त्रे देखील जप्त केली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने पोलीस प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी टोळीला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तथापि, या टोळीने नेमकी कुठे चोरी केली ? या प्रकरणातील व्यक्तीचे राजकीय संबंध याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तर, या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version