Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आ. पाटील यांच्याहस्ते माल्यार्पण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जुने गावातील नागेश्वर मंदिरातील सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा नियोजन समिती सदस्य ऍड. मनोहर खैरनार, नारायण जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शकुर जमदार, गोपाळ सोनवणे नगरसेवक पियुष मोरे, मुकेशचंद्र वानखेडे, संतोष मराठे, डॉ. आर. एन. शेवाळे, एस. एस. गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी दीपक खुळे, विशाल खुळे, अजय खुळे, शांताराम अवसरमोल, पुंडलिक जाधव, महेश खुळे, राजू सोनवणे, संदीप गायकवाड, चंद्रकांत साळवे, योगेश जाधव आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version