राज्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ डिसेंबर पर्यंत वाढ

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाचा प्रकोप अद्याप नियंत्रणात आला नसल्याने महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलाअसून आज यासंदर्भातला आदेश राज्य सरकारने काढला आहे.

मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे.यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

राज्यातील करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हे टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत आहेत. याबाबत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी गाइडलाइन्सही जारी करण्यात आल्या होत्या. दिवाळीतल्या पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातली मंदिरंही खुली करण्यात आली. या सगळ्या सवलती कायम असणार आहेत. मात्र कोविड संसर्ग होऊ नये या संदर्भातले सगळे नियम पाळणं आवश्यक आहे असंही सरकारने आदेशात म्हटलं आहे. ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे.

Protected Content