Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; स्वतंत्रपणे की आघाडीतर्फे ? -पवारांचं वक्तव्य  

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवाव्यात की स्वतंत्रपणे ?’ यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात महाविकास आघाडीत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली असून त्यांनी “महाविकास आघाडीत यासंदर्भात दोन मतप्रवाह असल्याचे सांगितले.

याविषयी बोलतांना त्यांनी या विषयी भिन्न मतप्रवाह असल्याचं सांगत  “याविषयी काहींचं म्हणणं आपापल्या स्वतःच्या चिन्हांवर निवडणूक लढवावी असं आहे तर काहींनी महाविकास आघाडीने एकत्रितपणे या निवडणुका लढवाव्यात असं मत असल्याचं” शरद पवार यांनी सांगितलं. असून यावर अजून एकमत झालं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजूनही प्रकरण गुलदस्त्यात असल्याने याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

 

Exit mobile version