दीपनगर, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातीलत दीपनगर येथील नवीन 660 मे.वॅ. प्रकल्पामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या अधिपत्याखाली बऱ्याचशा कंपन्या प्रकल्प उभारणीच्या कामात कार्यरत आहेत. सदर कंपन्याकडून असुरक्षितपणे काम करण्याच्या नियमावलीची पायमल्ली होण्याबाबतचे वृत्त लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेले होते. याची दखल घेऊन आता प्रशासनाने सुरक्षेबाबत तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दिपनगर येथील नवीन प्रकल्पामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या अधिपत्याखाली वेगवेगळ्या संस्थांमध्ये दोन ते तीन हजारापर्यंत कामगार कार्यरत असून सदर कामगारांवर सुरक्षेबाबतीत लक्ष ठेवण्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीकडे कमी मनुष्यबळ असल्याकारणाने प्रत्येक ठिकाणी भेल प्रशासनाला लक्ष ठेवणे शक्य नव्हते. परंतु सदर असुरक्षितरित्या काम करणाऱ्या काही कंपन्याबाबतीत भारत हेवी इलेक्ट्रिक कंपनीचे प्रकल्प संचालक डी.जे.जवादे यांनी ठोस दंडात्मक कार्यवाही करण्याचा पवित्रा घेतला आहे. ते स्वतः पूर्ण प्रकल्पामध्ये दोषी कंपन्या आणि अधिकाऱ्यांवर कार्यवाही करताना आढळून येत आहेत. प्रकल्प संचालक डी.जे.जवादे यांच्या कार्यकाळात दिपनगर येथील नवीन प्रकल्प लवकरात लवकर आणि वेळेच्या आत कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
दरम्यान, यासोबत महाजेनकोच्या सुरक्षा विभागाने सुद्धा प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. महाजेनकोचे मुख्य सुरक्षा अधिकारी रामटेके स्वतः मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहून कामगारांच्या प्रवेशपत्रांसह वाहनांच्या परवाना कागदपत्रांची तपासणी करताना आढळून येत आहेत. एकंदरीत प्रकल्पाच्या सुरक्षा आणि औद्योगिक सुरक्षेबाबत अनभिज्ञ असणारे अधिकारी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या प्रसारित करण्यात आलेल्या वृत्तांमुळे सावध होऊन त्यांनी याबाबत योग्य त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे.