लाईव्ह ट्रेंडस न्युज इफेक्ट : पुलाच्या साफ-सफाईला सुरूवात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याने लाईव्ह ट्रेंडस न्युजने “किनगाव येथील पुलाची दयनीय अवस्था” व “बऱ्‍हाणपूर अंकलेश्वर मार्गावरील पुलाची दयनीय अवस्था” या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते व या वृत्ताची दखल घेत यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या साफ-सफाईला सुरूवात केली.

तालुक्यातील गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांशी जोडणारा बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गालगत किनगाव गावाजवळ असलेल्या लेंडी व लव्हाळ या एकत्र आलेल्या नाल्यावरील पुलावर मातीसह कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने पुलावर दिवसेंदिवस वजन वाढत होते. तसेच पुलाच्या बाजुला कठड्यांनखाली पुलावरून पाणी वाहुन जाण्यासाठी टाकलेले पाईपांचे छिद्रे (होल) या मातीमुळे पुर्णपणे बंद झालेले होते. त्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते व पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल होत होता व या चिखलावरून जर एखादे वाहण स्लीप झाले(सरकले) असते तर ५० ते ६० फुट खोलवर नाल्यात पडून मोठा अपघात होऊ शकला असता या सर्व समस्यांमुळे वाहनधारकांनमध्ये तिव्र नाराजी होती.

या पुलाच्या वजनाबरोबरच चिखल व साचणाऱ्‍या पाण्याचे वजन या पुलावर झाल्याने या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. दररोज हजारो वाहनांचा वापर या पुलावरून असल्याने नियमीत या पुलाच्या देखभालीकडे लक्ष ठेवणे गरजेचे होते. मात्र सार्वजनीक बांधकाम विभागाचे कोणीही आधीकारी या पुलाच्या दुरूस्तीकडे लक्ष देत नव्हते. दिवसेंदिवस या पुलावर मातीमुळे वजन वाढत होते तर आता पावसाळा सुरू झाल्याने या पुलावर चिखलासह मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. पुलावरून माती काढल्यामुळे या पुलावरील रस्त्याची दोन मिटरने रूंदी वाढली असून वाहातुक सुरळीत झाल्याने वाहनधारकांसह नागरीकांनी लाईव्ह ट्रेड न्युजचे कौतुक केले आहे. तसेच या पुलाच्या चोपडा व यावलकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असुन बऱ्‍याचदा येथे लहान मोठे अपघातही झालेले आहे. तरी या खड्डेमय रस्त्याचीही दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

 

Protected Content