Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

LIVE : शाम दीक्षित यांच्या नातेवाईकांचे जिल्हा रुग्णालयात आंदोलन

18896707 4da8 421e 972c 886dac9b5ced

जळगाव प्रतिनिधी । शाम दीक्षित यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, आमदार राजूमामा भोळे हे आंदोलनस्थळी नातेवाईकांची समजूत काढत आहेत.

 

शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मोहितराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा. सबजेल मागे ,जळगाव) , सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) या दोघांनी मिळून केला आहे. पोलीस दोघं संशयित आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान, सनी उर्फ चाळीस हा संशयित आरोपी हा नुकताच जळगावात गाजलेल्या चिंग्या खून प्रकरणातून जामिनावर बाहेर आला असल्याचे कळते.

दरम्यान, शाम दीक्षित यांच्या नातेवाईकांनी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहचले असून नातेवाईकांची समजूत काढत आहेत. आरोपींची कळाली असून त्यांच्या शोधार्थ पथकं देखील रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करू असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

 

 

Exit mobile version