Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजीनगरचा रेल्वेपूल इतिहास जमा ( व्हिडीओ )

 

जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर पुलाचा सांगाडा काढण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येत असून या ऐतिहासीक क्षणाचे थेट आपल्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.

शिवाजीनगर रेल्वे पूल पाडण्याचे काम गत काही दिवसांपासून सुरू आहे. यातील बहुतांश भाग हा पाडण्यात आला असून यासाठी काही मिनी ब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र या पूलाचा सर्वात महत्वाचा भाग असणारा सांगाडा शिल्लक होता. यासाठी आज मंगळवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकळी 10.15वाजता मेगाब्लॉक घेण्यात आला. यासाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सांगाडा उचलण्याचे काम हे रेल्वे प्रशासनाच्या क्रेनच्या मदतीने करण्यात आले. यासाठी रेल्वेच्या महाबली क्रेन्स जळगावात काही दिवसांपूर्वी दाखल झाल्या होत्या. एकाच वेळेस दोन टनोगणती वजन असणारी सामग्री उलण्यास सक्षम असणार्‍या या क्रेन्स सर्वसाधारणपणे वापरण्यात येणार्‍या क्रेन्सपेक्षा अनेक पटीने जास्त आहेत.

आज सकाळी साधारणपणे सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास रेल्वेचा मेगाब्लॉक करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूने पोलिसांचा ताफा खबरदारीसाठी उपस्थित होता. प्लॅटफॉर्मची बाजू आणि तहसील कार्यालयाची बाजू या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नागरिकांनी बघ्याची भूमिका बजावली होती. यावेळी शिवाजीनगर वाशी यांनी सगळा कसा उचलतात हे पाहण्यासाठी गर्दी केली होती.
रेल्वे प्रशासनाचे सर्व अधिकारी व रेल्वे पोलीस कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती. तसेच जाणार्‍या-येणार्‍या शिवाजीनगर वासियांना येण्या-जाण्यासाठी रेल्वे पोलीस प्रशासन मदत करीत होते.

सांगाडा उचलण्याच्या विविध टप्प्यांचे क्रमवार व्हिडीओ खाली दिलेले आहेत.

सुरू झाल्यानंतरचे क्षण.

Exit mobile version