Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव रिक्षाच्या धडकेत चिमुकली जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगर रोडवरील दुध फेडरेशन जवळ भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत ८ वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनक मुकेश सोनवणे वय ८ रा. ओमसाई नगर, जळगाव असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील ओमसाई नगर येथे कनक सोनवणे ही चिमुकली आपल्या परिवारासह राहते. मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ती खासगी क्लासला पायी जात होती. त्यावेळी शिवाजी नगर रोडवरील दूध फेडरेशनसमोरील रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकली कनक ही जखमी झाली. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ अलका वानखेडे हे करीत आहे.

Exit mobile version