Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

 

 

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (दि.5) जाहीर केली आहे.

यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आ.छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, आ.शशिकांत शिंदे, आ.हसन मुश्रीफ, आ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अनिल देशमुख, शेतकरी नेते अण्णा डांगे, आ.राजेश टोपे, खा.डॉ.अमोल कोल्हे, खा.वंदना चव्हाण, खा.माजिद मेमन, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, वर्षा पटेल, आ.प्रकाश गजभिये, आ.किरण पावसकर, आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.रामराव वडकुते, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, शब्बीर विद्रोही, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, नरेंद्र वर्मा, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, नसीम सिद्दीकी, शेख सुबान अली, अविनाश धायगुडे, प्रदीप सोळंके, सुषमा अंधारे, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर आदींचा या यादीमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे सदस्य व पक्षाचे स्थायी राष्ट्रीय सचिव एस.आर.कोहली यांनी प्रचारकांची यादी पक्षाच्यावतीने जाहीर केली आहे.

Exit mobile version