Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात दारूविक्रीचे दुकाने बंद राहणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील १४ तालुक्यातील एकूण १४० ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे कडून, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. जिल्हयातील एकूण 140 ग्रामपंचायतीच्या निवडणूकी साठी 18 डिसेंबर, 2022 रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सदर ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम 2022 अंतर्गत प्रत्यक्ष निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मतदानाच्या दिवशी निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान शांततेत पार पाडाव्यात तसेच त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोबत जोडलेल्या यादीत नमुद केलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील मदयविक्री दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी यांचे 5 डिसेंबर, 2022 रोजीच्या पत्रा नुसार ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर, 2022 या कालावधीत जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या असल्याने तेथे 18 डिसेंबर रोजी निवडणूका पार पडणार आहेत.

महाराष्ट्र विदेशी मदय (रोखीने विक्री व नोंदवहया इ) चे नियम 1969 चे नियम 9(अ) (2) (C) (1), (2)  तसेच महाराष्ट्र देशी मदय नियम 1973 चे नियम 26 (C) (1), (2), तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने ( ताडी झाडे छेदणे) 1968 चे नियम 5 (अे) (1), (2)   टी.डी,1 अनुज्ञप्तीतील अ.क्र.11 (a) अन्वये मदय विक्री दुकाने असलेल्या निर्वाचन क्षेत्रात ज्या दिवशी स्थानिक प्राधीकरणाच्या सार्वत्रीक निवडणुका किंवा पोटनिवडणुका होत असलेल्या ठिकाणी मतदानाचा दिवस मतदानाच्या अगोदरचा दिवस व मतमोजणीचा दिवशी मदय विक्री बंद ठेवण्याबाबत नमुद केलेले आहे. तरी जिल्हयातील 140  ग्रामपंचायती निवडणूक मतदानाच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये मदयविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version