Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा निकाल

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी जावेद सलीम शेख याला युक्तवादानंतर  आज बुधवार २२ सप्टेंबर रोजी संशयित दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दंड सुनवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २४ जून २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आली व जेवण झाल्यानंतर पुन्हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर मोकळ्या जागेवर शौचालयाला गेली. त्यावेळी तेथे राहणारा आरोपी जावेद सलीम शेख याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी जावेद सलीम शेख याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा दोषारोपत्र  जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती डी.एन. खडसे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. यात सरकारपक्षातर्फे एकुण सहा साक्षिदार तपासण्यात आले. यात मुलीची साक्ष व इतर साथीदारांची सक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील चारूलता बोरसे यांनी युक्तीवाद केला. न्या. खडसे यांनी साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने जावेद सलीम शेख याला दोषी ठरवत भादवी कलम ३५४ अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजाराचा दंड, बाल लैंगित अत्याचार अधिनियमान्वये ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजाराचा दंड तसचे कलम ५ अन्वये जन्मठेप आणि ५ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याकामी पैरवी अधिकारी देवीदास कोळी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version