Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व दंड (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज । चाळीसगाव शहरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७) रा. मानसिंगका कॉलनी, पाचोरा या नराधमाला अवघ्या ६० दिवसात विशेष न्यायालयाचे न्या. एस.एन. माने-गाडेकर यांनी दोषी ठरवत आजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

अशी आहे घटना

चाळीसगाव शहरात राहणारी चार वर्षाची चिमुकलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो असे सांगून आरोपी सावळाराम भानुदास शिंदे याने चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात पोक्सो कायद्यांतर्गत सावळाराम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून सावळाराम शिंदे याला चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली होती. त्याच्यावर भादवी कलम ३६३, ३६६(अ), ३७६ (एबी) व पोस्को कायदा अंतर्गत  कलम ४, ५ (एम), ६, ८,९ व १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 १७ दिवसात गुन्ह्याचा तपास पुर्ण

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्याकडे सोपविला. त्यानंतर पोलीसांनी आरोपी व पिडीत मुलीचे कपडे व अंगावरील नमुने तात्काळ प्रयोगशाळेत पाठवून डीएनए अहवाल प्राप्त करून १७ दिवसात गुन्ह्याचा तपास पुर्ण केला.

 

६० दिवसात खटल्याची सुनावणी पुर्ण

विशेष न्यायालया श्रीमती एस.एन.माने-गाडेकर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करयात आले. त्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी हा खटला जलदगीतने चालविण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या ६० दिवसात सुनावणी पुर्ण करून बुधवार १६ फेब्रुवारी रोजी खटल्याचा निकाल दिला आहे. सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७) रा. मानसिंगका कॉलनी, पाचोरा या दोषी ठरवत विविध कलमान्वये दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप आणि दोन लाख ७५ हजार दंड  ठोठावला आहे.

 

यशस्वी कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार 

अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, सहाय्यक तपासाधिकारी सपोनि विशाल टकले, पो.ना. राकेश पाटील, राहूल सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल विमल सानप, सबा शेख, दिलीप सत्रे यांनी खटल्याच्या कामी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची उपस्थिती होती.

 

पिडीतेला मिळाला न्याय

आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७) रा. मानसिंगका कॉलनी याला मरेपर्यंत जन्मठेप आणि २ लाख ७५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. दंडातील ५० टक्के रक्कम ही पिडीतेला देण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. शिवाय मनोधेर्य योजनेतून ३ लाख रूपये आणि शासनाकडून १० लाख देण्याचे आदेश दिले आहे.

Exit mobile version