Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताच्या लष्करप्रमुख पदी ले.जनरल मनोज पांडे

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे पुढील लष्करप्रमुख असणार आहेत. पांडे हे सध्या लष्कराचे उपप्रमुख असून ते जनरल एम. एम. नरवणे हे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होतील त्यांच्यानंतर जनरल पांडे हे लष्करप्रमुख असणार आहेत.

लष्करप्रमुख नजरल मनोज नरवने यांच्या निवृत्तनंतर त्यांच्या जागी सध्याचे उपलष्करप्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे नवे लष्करप्रमुख होणार आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण असेल यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंतिम सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर हे पद रिक्त आहे.

मनोज पांडे यांनी लष्करात अनेक महत्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या आहेत. लष्कराचे दक्षिण मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांड सेंटरचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या सोबतच लष्कराच्या इस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Exit mobile version