Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुज्ञेय दराने आकारणी करा आ. चंद्रकांत पाटील यांच्या सुचना

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हतनूर प्रकल्प – तापी व पुर्णा नदीच्या जलाशयातुन प्रकल्पग्रस्त असलेले शेतकरी खाजगी उपसा सिंचन करून शेती करतात त्यांचेकडून जलसंपदा विभाग पाणीपट्टी वसुली ही अनुज्ञेय दराने (१००%) करीत होती. परंतु ‘महाराष्ट्र जलसंपती नियमन प्राधिकरण’ आदेशान्वये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुज्ञेय दर ५०% दराने आकारणी करावी, असे सदर प्राधिकरणाचे आदेश असल्याचे चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर यांनी ९ जानेवारीच्या पत्रान्वये संबंधित अधिक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव यांचे निदर्शनास आणून दिलेली असून संबंधितांनी यानुसार कार्यवाही करणेबाबत कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांना आदेशित केलेले आहे.

त्यामुळे लाभक्षेत्रात सर्व ‘प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी संधीचा लाभ घ्यावा मा. आमदारांचे उपरोक्त कार्यवाहीमुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

 

Exit mobile version