Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुणे पोलीस अधिकाऱ्याचा लेटर बॉम्ब

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुली टार्गेट प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने खळबळ उडाली होती, तर आता पुणे येथील माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासाठी २०० कोटीपेक्षा अधिक रकमेची वसुली केल्याच्या  लेटर बॉम्ब एका पोलीस अधिकाऱ्याने फोडला आहे.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग वसुली टार्गेट प्रकरणी चर्चेत  होते, तर आता  पिंपरी चिंचवड येथील आयपीएस माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासाठी त्यांच्या आयुक्त कार्यकाळात जमीन खरेदी विक्री व्यवहारातून २०० कोटी पेक्षा अधिक रकम जमा केली. तसेच पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासाठी जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी या कर्मचाऱ्यासह अन्य चार सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, सामजिक कार्यकर्ते आदीचा सहभाग असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे या पोलीस अधिकाऱ्यानेच केला आहे.

तसेच पुणे विभागातीलच सेवा विकास बँक घोटाळाप्रकरणी संचालकाला अटक करू नये, बेटिंग करणाऱ्याला अटक करून नये यासाठी ४ ते ५ कोटी रुपये तसेच राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित घोटाळ्यात पत्रकाराला देखील लाखो रुपये देण्याचे कृष्णप्रकाश यांनी सांगितले होते.  कनिष्ठ पदावर असल्यामुळे वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अनेक बांधकाम व्यवसायिक तसेच  महिलांशी संबधीत नकोशी कामे देखील करावी लागली.  काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जात असे, सपोनि. डोंगरे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version