Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिबट्याने केली बकरी फस्त; वन विभागाचे नागरीकांना सर्तकेतेचे आवाहन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा सिम जवळच्या नागादेवी वनक्षेत्रात बिबट्याने एका बकरीला पस्त केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जंगलात राहणाऱ्या आदीवासी बांधवांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार, “तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी वनक्षेत्रातील जंगलात अनिल विश्राम पाटील यांच्या (मालकी गट क्रमांक १९१) शेतात सालदारी मजुर म्हणून काम करणारा लालसिंग बारेला यांच्या घरासमोरील गोठयात बांधलेली बकरीवर दि. १२ जुलैच्या मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून तिला ओढुन जंगलात घेवून गेल्याची घटना घडली असून या घटनेमुळे लालसिंग बारेला यांचे कुटुंबात भिती व्यक्त करण्यात येत आहे.                                     

या घटनेचे वृत्त कळताच पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.टी.भिलावे यांनी तात्काळ सदरच्या घटनेची चौकशी करण्याची सुचना दिल्याने पश्चिम वनक्षेत्राचे वनसंरक्षक बी वाय नलावडे, वनपाल आर बी पाटील, वनपाल आर एस शिंदे यांनी नागादेवी जंगलात जावून प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा करून बिबटयाच्या पायाचे ठसे घेतल्याने या क्षेत्रात तीन वर्ष वयाच्या बिबटयाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. या घटनेनंतर या क्षेत्रातील शेती करणारे शेतकरी व शेतमजुर यांनी एकटया व्यक्तिने जंगलात जावू नये. असे आवाहन पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.टी.भिलावे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

 

Exit mobile version