Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुका विधी समितीतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी । यावल तालुका विधी सेवा समिती व यावल वकील संघातर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर यावल न्यायालयात घेण्यात आले.

न्या. एम.एस. पंचर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ॲड. ए. आर. सुरळकर, समांतर विधी सहाय्यक वारूळकर, ॲड. जी. के. पाटील, ॲड. पंडित कुमार राजे यांच्यासह सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला ॲड. ए.आर. सुरळकर आणि समांतर विद्युत सहाय्यक वारकऱ्यांनी बाल लैंगिक कायदा तर ॲड. जी.के. पाटील यांनी फौजदारी प्रकरण संहिता कलम ९७ अन्वये घडणाऱ्या घटनांची व गुन्ह्याची पार्श्‍वभूमी आणि कायद्याची माहिती देण्यात आली तर भुसावळ वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ पंडित कुमार राजे यांनी न्यायालयात कामकाज कसे चालतात, कसे काम चालते. या संदर्भात स्वतःचा अनुभव कथन करून काही त्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला यावल दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. बनचरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कायद्याची भारतीय राज्यघटनेनुसार आवश्यक ती माहिती अत्यंत सुलभ व सोप्या भाषेत सांगितले. आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत विधी सेवा समिती तथा यावल न्यायालयाचे वकील, समांतर विद्युत सहाय्यक व न्यायालयीन कर्मचारी यांनी राबवलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.

 

 

 

Exit mobile version