Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड येथे कायदेविषयक जनजागृती

बोदवड प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त इंडिया अवरेनेस कार्यक्रमांतर्गत आज बोदवड येथील नगरपंचायत कार्यालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश खंडारे यांनी कायदेविषयक जागृती पर आर्थिक दुर्बल घटकांना कायद्या व शासनाच्या विविध योजना याबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण मत मांडले. गरजूंनी यावेळी पुढे यावे तसेच शेवटच्या माणसापर्यंत नाय पोहोचला पाहिजे याकरता सदर जनजागृती करण्यात येत आहे तसेच लोक न्यायालय याबाबतही माहिती दिली. यावेळी बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट अर्जुन पाटील यांनी आर्थिक दुर्बल घटकांना तालुका न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय पर्यंत मोफत कायदेविषयक सल्ला व वकिलाची नेमणूक करता येते. त्याकरिता पीडित व्यक्तीने  संबंधित न्यायालयाच्या विधी सेवा प्राधिकरण कडे अर्ज केला पाहिजे.  याबद्दल माहिती दिली. बोदवड न्यायालयाचे सरकारी वकील कलंत्री यांनीही शासनाच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या कायदेविषयक विविध योजना बाबत माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट के. एस इंगळे यांनी केले यावेळी, तर आभार प्रदर्शन एडवोकेट धनराज प्रजापति यांनी केले.

सदर कार्यक्रमास नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक चव्हाण साहेब हे उपस्थित होते .तर यावेळी मोठ्या प्रमाणावर नगरपंचायत  कर्मचारीवर्ग तसेच नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी सत्तेसाठी न्यायालयीन कर्मचारी विधी सेवा प्राधिकरणाचे एस.एस .परसे ,बी.पी. पाटील , भिका सोनवणे, रामेश्वर जाधव अविनाश पोफळे,एस.आर .थोरात, योगेश वंजारी, विशाल चौबे,एस एस मणियार विधी महाविद्यालय व डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी मोहिनी नाहिसे, नगरपंचायत बोदवळ कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले

 

 

 

Exit mobile version