Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मॅच फिक्सिंग करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

Offence match

 

मुंबई वृत्तसंस्था । गेल्या काही महिन्यांपासून मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात प्रचंड वाढ होत आहे. या प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी श्रीलंका सरकारने प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. तसेच यासंदर्भात तीन महत्त्वाची विधेयके मंजूर केली असून ESPNCricinfo संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिले आहे.

‘खेळाशी संबंधित गुन्हेगारी रोखणे’ (‘Prevention of Offences related to sports’ ) या कायद्याअंतर्गत श्रीलंकेत मॅच फिक्सींग करणाऱ्या आरोपीला १० वर्षांची कैद होऊ शकते. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हरीन फर्नांडो यांनी लंकन संसदेत हे विधेयक सादर केले असून, सध्या श्रीलंकेत कॅबिनेट मंत्री असलेल्या अर्जुन रणतुंगानेही याला आपला पाठींबा दर्शवला आहे. या विधेयकात खेळाडूंसोबत, संघाची गोपनिय माहिती बाहेर देणे, खेळपट्टीची माहिती जाहीर करणे या अंतर्गत क्युरेटर आणि इतर कर्मचाऱ्यांनाही सहभागी करण्यात आलेले आहे. विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहर उमटेपर्यंत याचं कायद्यात रुपांतर होणार नाहीये. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पुढील १० दिवसांत या विधेयकाचं अधिकृतपणे कायद्यात रुपांतर होईल. काही महिन्यांपूर्वी, श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या, नुवान झोयसा यांच्यावर आयसीसीने फिक्सिंगच्या आरोपाखाली दोन वर्षांची बंदी घातली आहे.

Exit mobile version