Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माफी मागा नाही तर कायदेशीर कारवाई : राष्ट्रवादीचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत चुकीचे आरोप केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि आ. चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी दिला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक पत्रक जारी करत पवारांबद्दल करण्यात आलेल्या ट्विटवरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजपाने पवारांची माफी मागणी असं म्हटलं आहे. भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत शरद पवार हे हिंदू धर्माचा द्वेष, अपमान करतात अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत असं सांगत भाजपाच्या विपरीत बुद्धीची व जाती धर्मात तेढ निर्माण करण्याच्या वृत्तीची कीव येते असा टोला वरपे यांनी लगावलाय.

‘शरद पवार यांनी कधीही कोणत्याही जाती धर्माचा अपमान होईल, अशी कृती केलेली नाही. हिंदू देव देवतांचा अपमान केलेला नाही. उलट हिंदू धर्मातील देवदेवतांचा आदर करत आल आहेत. कित्येक हिंदू दवतांच्या मंदिरांचा पवार यांनी जीर्णोद्धार केलेला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. पण महाराष्ट्रात काहीही करुन तेढ निर्माण करुन सत्तेसाठी हपापलेले भाजपाचे नेते पवारांना हिंदू विरोधी ठरवून खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत,’ असा आरोप वरपे यांनी केला आहे.

या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, पवार साहेबांनी आपल्या भाषणात ज्या कवितेचा उल्लेख केला ती कवी जवहार राठोड यांच्या काव्यसंग्रहातील ‘डोंगराचे ढोल’ ही कविता होती. यात पाथरवट समाजाचे जीवन, वंचित, उपेक्षित समाजाची व्यथा मांडलेली आहे. समाजाचे दु:ख कविता, लेखांच्या माध्यमातून तोच समाज मांडत असेल, तर तो काय हिंदू धर्माचा किंवा देवदेवतांचा अपमान नसतो. त्या समाजाच्या न्याय हक्कासाठी शरद पवार साहेब गेली अनेक वर्ष लढत आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र्ला माहीत आहे. पवार यांनी कधीही हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही. भाजपा नेते मात्र केवळ अर्धवट माहितीच्या आधारे आम्हीच फक्त हिंदूंचे कैवारी असा आव आणत आहेत. त्यांच्याच्या भाषणातून एक छोटीशी क्लीप काढून हिंदू समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम भाजपा करत आहे.

कवी जवाहर राठोड यांच्या कवितेतील पाथरवट या शब्दाला अर्थ असा आहे, की दगडाला आकार देणारा समाज, मूर्ती घडवूनही या समाजाला देवळात जाण्याचा अधिकार नाही. या व्यथा या कवितेतून मांडल्या आहेत. याचाचा उल्लेख पवार यांनी आपल्या भाषणात केला. मात्र भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांना यातही जाती, धर्माचा तिरस्कार दिसला. यावरुन भाजपाच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते, असा टोला वरपे यांनी लागावला आहे.

पवारांवर ते नास्तिक असल्याचा सातत्याने आरोप भाजपा करत आहे. पण पवार नास्तिक आस्तिक हा विषय बाजूला ठेवून बेरोजगारी, महागाई, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था हे विषय सातत्याने दौरे करुन चव्हाट्यावर आणत आहेत. हे भाजपाच्या मनाला लागलेले आहे. म्हणूनच धर्माचा आधार घेऊन भाजपा राजकारण करत आहे. थोटा इतिहास सांगणे अर्धवट अभ्यास करुन चुकीचे बोलणे व समाजामध्ये दिशाभूल करणे ही भाजपाची संस्कृतीच आहे, असा टोलाही राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी लगावला आहे.

Exit mobile version