Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पळासखेडा फार्मसी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांविषयी व्याख्यान

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात पळासखेडा येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या वतीनं ‘स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि महत्त्व’ याविषयी सचिन जाधव यांचं व्याख्यान संपन्न झालं.

शुक्रवार, दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य पराग कुलकर्णी यांच्या हस्ते सचिन जाधव यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं.

व्याख्यानात जाधव यांनी ‘Graduate pharmacy Aptitude Test National Institute of Pharmaceutical education and research’ आणि ‘Drug inspector’ या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि महत्त्व याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.

या व्याख्यानात ‘Graduate pharmacy aptitude test’ या विषयावर भर देताना अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती देत विविध विषयांच्या गुणांचं वर्गीकरण, त्यासाठी करायची तयारी या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच विद्यार्थ्यांना बी फार्मसी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या आयुष्यात कोणत्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहे. याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

या आधीची व्याख्यानासाठी द्वितीय आणि तृतीय वर्षाचे बी फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केलं.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल व्यवस्थापन मंडळातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय शास्त्री आणि संस्थेचे सचिव रुपा शास्त्री यांनी सचिन जाधव यांचे आभार मानले.

Exit mobile version