Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष प्रभुणे यांचे व्याख्यान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  पारधी व भटके विमुक्त समाजाला विज्ञानाचे सखोल ज्ञान असून ते ज्ञान संपन्न समाजाचे वाहक आहेत असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष प्रभुणे केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्र.कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र वद्यिापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘भारताच्या उभारणीत भटके विमुक्तांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते प्रभुणे पुढे म्हणाले की, रसायन, भुमि, औषधी, प्राणी,पक्षी, वातावरण, निसर्ग, शेती व गणित अशा विविध विषयांचे पारधी व भटके विमुक्त  समाजाला सखोल ज्ञान आहे. भारतीय संस्कृती जतन करण्यात या समाजाचा मोठा हात आहे. सर्वच क्षेत्रात भारताना पुढे नेण्यासाठी या समाजाने वेळोवेळी पुढाकार घेतल्याचे आपण दिसून येते.  इंग्रजी सत्तेच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढा उभारूण प्राणपणाने ते लढले. आपण त्यांचे योगदान ओळखले पाहिजे.

 

आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रा.बी.व्ही.पवार यांनी सांगीतले की, समाजातील मुलांचे शिक्षण व सर्वांगिण विकास यासाठी गुरूकुलम ही संस्था स्थापन करून उल्लेखनीय कार्य करीत असलेले व फक्त सामाजिक कार्यकर्तेच नव्हे तर लेखक, कवी आणि उत्तम चित्रकार अशी देखील ओळख असलेले व त्याच बरोबर पारधी समाजाच्या अडचणी, त्यांचे प्रश्न सीमित न राहता ते सर्वांपर्यंत पाहोचावे यासाठी आपल्या लेखनितून या गोष्टी समाजासमोर मांडणारे श्री.प्रभुणे यांचे कार्य खुप मोठे असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत या सारखे समाजसेवक निर्माण होणे गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा.मनिष जोशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रशांत धनगर यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  सुभाष पवार यांनी केले. मु.लता सोनवणे हिने आभार मानले. यावेळी श्रोत्यांकडून प्राप्त काही प्रश्नांची उत्तरे श्री.प्रभुणे यांनी दिलीत.

Exit mobile version