Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अच्युत गोडबोले यांचे आज व्याख्यान व पुस्तक प्रकाशन

achuyut godbole

 

जळगाव (प्रतिनिधी) पद्मश्री डॉ.भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्ताने नोबेल फाऊंडेशन व भरारी फाऊंडेशनतर्फे दि. ८ रोजी महाराष्ट्रातील नामवंत लेखक व आयटी तज्ञ डॉ.अच्युत गोडबोले यांचे ‘मी कसा घडलो’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान कांताई सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमात नोबेल प्रकाशन प्रकाशित पुस्तकांचे प्रकाशन डॉ.गोडबोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशन व के.के.कॅन्स यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात अच्युत गोडबोले पालक, विद्यार्थ्यांसह जळगावकरांशी सवांद साधणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून माजी कुलगुरू डॉ के बी पाटील, जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, के के कॅन्सचे रजनीकांत कोठारी, महावीर क्लासेसचे नंदलाल गादिया, सीओईटी बांभोरीचे डॉ संजय शेखावत, उद्योजक सुनील पाटील उपस्थित राहतील. या वेळी पत्रकार डॉ.युवराज परदेशी लिखीत “आऊट ऑफ बॉक्स” प्रियंका पाटील लिखीत कलामांचे विचारधन (दुसरी आवृत्ती) तसेच डॉ.नरसिंग परदेशी-बघेल लिखीत “मध्ययुगीन भारतातील बिकानेर-महाराष्ट्र संबंध” या तिन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

Exit mobile version