Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी चोरून नेतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामावर जाण्यासाठी दुचाकी बाहेर काढली आणि डबा घेण्यासाठी घरात गेले तेवढयात अंगणात लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. दरम्यान दुचाकी चोरटा हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाकर सदाशिव पाटील (वय-४५) रा. विद्यानगर, पिंप्राळा परिसर हे पत्नी व मुलासह वास्तव्याला आहे. बांधकामाचे स्टाईल्स बसविण्याचे काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामावर जाण्यायेण्यासाठी त्यांच्याकडे, (एमएच १९ डीजे ६९५५) क्रमांकाची दुचाकी आहे. दरम्यान मंगळवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता त्यांनी त्यांची दुचाकी कामावर जाण्यासाठी कंपाऊंडच्या बाहेर काढली व जेवणाचा डबा घेण्यासाठी परत घरात गेले. त्यावेळी दुचाकीला चाबी लावलेलीच होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी घेवून जात असतांना जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी कमलाकर पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रामांनद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. जितेंद्र तावडे करीत आहे.

Exit mobile version