Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेची पर्स लांबवीणाऱ्या आरोपीला अटक

jail

जळगाव (प्रतिनिधी) दोन दिवसापूर्वी रिक्षातून उतरतांना महिलेच्या हातातून पर्स लांबविली होती. जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या रिक्षाचालकाच्या शहर पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या रिक्षाचालकाला पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, जिल्हा पेठ पो.स्टे. हद्दीत २४ जुलै रोजी सपना जित चव्हाण (वय-२६ रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे समता नगर) हे त्यांचे पती डॉ. मिलींद चौधरी यांच्यासोबत मंगलमुर्ती हॉस्पिटल येथे ड्रेसिंग करण्यासाठी आल्या होत्या. त्या पांडेचौकातील रामा शूज सेंटरजवळ उतरल्यानंतर रिक्षाचालका पैसे देत असतांना रिक्षाचालकाने त्यांच्या पर्समध्ये पैसे पाहिले. याचवेळी रिक्षाचालकाने सपनाबाई यांच्या हातातील पर्स हिस्कावून पळ काढला. महिलेने रिक्षेचा नंबर लक्षात ठेवला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रिक्षाचालक पिंप्राळा हुडकोतील असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांना मिळाली. त्यानुसार सफौ. वासुदेव सोनवणे, रतनहरी गिते, तेजस मराठे, दिपक सोनवणे, योगेश इंधाटे, विजय निकुंभ यांनी सापळा रचून रिक्षाचालक राजेंद्र राहुलाल केदार वय २८ रा. पिंप्राळा हुडको याला एमएच १९ व्ही ३६२६ क्रमांकाच्या रिक्षेसह ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधीन केले.

Exit mobile version