Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली : भाजपा केंद्रीय गृह सचिवांकडे करणार तक्रार

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |  राष्ट्रवादी काँग्रेसकडून कट रचून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यात आला. याचा निषेध म्हणून पुण्यात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भाजपच्या जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुंडागर्दी करण्यात येत आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांच्यासह महिलां पदाधिकाऱ्यानी गोंधळ घातला. तसेच  निवेदन देऊन म्हणणे मांडणार होते, तर अंडी, बांगड्या कशासाठी आणल्या होत्या, असा प्रश्न मुळीक यांनी विचारला आहे.

आमच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिले सोबत जे घडले, त्याचे आम्ही समर्थन करीत नाही. परंतु आमच्या पदाधिकाऱ्यांवर विनयभंग सारखे गुन्हे दाखल केले आहे. यामुळे एखादा कार्यकर्त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे हे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकार तसेच राष्टवादीच्या पदाधिकाऱ्याकडून नेहमीच गुंडागर्दी केली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री ना. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्टवादीच्या पदाधिकाऱ्याकडून जो गोंधळ घातला गेला त्याची तक्रार केंद्रीय गृह सचिवांकडे करणार असल्याचेही जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.

Exit mobile version