Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत भाजीपाला विक्री केंद्राची सुरुवात

 धरणगाव  प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय धरणगाव  यांच्या मार्फेत ‘विकेल ते पिकेल’ योजने अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री या  संकल्पनेवर आधारित शेतमाल व भाजीपाला  विक्री केंद्राचे उदघाटन  छत्रपती शिवाजी महाराज चौक धरणगांव व एरंडोल रोड अमोल रेसिडेंसी जवळ या दोन ठिकाणी   जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले . 

या प्रसंगी  शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव  वाघ , सभापती पं.स.  मुकुंदभाऊ नन्नवरे,  जि.प. सदस्य गोपाल चौधरी ,  नगरसेवक राजेंद्र महाजन ,  विलास महाजन ,  भागवत चौधरी , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर ,  प्रकल्प उपसंचालक आत्मा जळगांव मधुकर चौधरी , उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव जाधवर, प्रांताधिकारी विनय  गोसावी,  तहसिलदार  नितीनकुमार देवरे , आत्मा बिटीएम दिपक नागपुरे ,  कृषि पर्यवेक्षक किरण देसले , कृषि पर्यवेक्षक अरुण कोळी , कृषि सहाय्यक राजेंद्र लोहार , किरण वायसे , गजानन मोरे , चंद्रकांत जाधव , रमेश महाजन  हजर होते.

या प्रसंगी भोल्हाई माता शेतकरी गट , राजश्रीशाहु महाराज कृषि विज्ञान मंडळ , भटाईमाता शेतकरु गट बिलखेडा , साई गजानन शेतकरु उत्पादक कंपनु धरणगांव  यांच्या मार्फेत सेंद्रिय भाजीपाला विक्री करण्यात आले.   या शेतमालाला ग्राहकांनी पसंती दिली तसेच  सदरील कार्यक्रमात, शेवगा, कांदा, टोमॅटो,  कारले, दुधीभोपळा, दोडके, शेपू पालक, मधुमका,गाजर, कागदी लींबु, वांगे खरेदीस ग्राहकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला सदरील कार्यक्रम कृषि विभाग व महसुल विभाग धरणगांव यांचे सँंयुक्त विदद्यमानाने आयोजित करण्यात आला होता.

 

Exit mobile version