Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावात शिव संपर्क अभियानास सुरुवात (व्हिडीओ)

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज शिवसेनेच्या वतीने शिवसेना आपल्या दारी व महिला सदस्य नोंदणी शिव व संपर्क अभियानास रावेर लोकसभा मतदार संघाच्या महिला संपर्कप्रमुख उषाताई मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारा जुलै ते 24 जुलै पर्यंत संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज संपर्क अभियानात सुरुवात झाली. यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या महिला संपर्क प्रमुख उषाताई मराठी यांच्या हस्ते महिलांना शिवसेना पक्ष प्रवेश देण्यात आला. भुसावळ तालुक्यातील महिलानां निवृत्ती प्रमाणपत्रही देण्यात आले. हा कार्यक्रम वरणगाव येथील शिवाजीनगर मध्ये घेण्यात आला. यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख समाधान महाजन उपजिल्हाप्रमुख उत्तमराव सुरवाडे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

Exit mobile version