Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात प्रहार जनशक्ती सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ

अमळनेर प्रतिनिधी । येथे ब्राम्हण सेवा संघ मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन  व माल्यार्पण करून छत्रपती महाराजांच्या च्या जयघोषात सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी अनिल चौधरी ( उत्तर महाराष्ट्र प्रमुख) यांनी सांगितले की, प्रहार जनशक्ती पक्ष हा नवीन पक्ष नाही शेतकरी कष्टकरी याचे कैवारी नामदार बच्चु कडू याचे विचार गावा- गावात पोचले असुन फक्त जनतेला आठवण करून दयाची आहे. बच्चु भाऊचे  विचारांनी कार्यकर्ते ध्येय वेडे झाले आहेत. तरी आपल्याला ही संधी चालून आलेली आहे. ह्या संधीचे सोने आपण करावे ह्या पक्षाचे सदस्य होऊन पक्षाचे व बच्चु भाऊ चे हात बळकट करावयाचे आहेत. आपण सर्व मिळून त्यांचे विचार गावा गावा पर्यंत जाऊन घरा घरामध्ये पोहचवा असे आव्हान केले. आगामी काळात कोणताही निवडणूक असो नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद याची रंगीत तालीम असणार त्या साठी प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते कसा निवडुन येणार या साठी सर्व परी मदत करु.व निवडूनही आणु. जळगाव जिल्ह्याला अनिल चौधरी काही नवीन नाही तुम्ही फक्त आवाज द्या तुमच्या पाठीशी नाही तर खाद्याला खाद्य लाऊन ऊभा रहिल अशी  ग्वाही देतो. भविष्यात आपला पक्षाचा कार्यकर्ता कसा मोठा होईल याच्यात  आम्हाला आनंद आहे आपल्याला 100% समाज कारण करायचे आहे राजकारण फक्त वेळेवरच करायचे असते आपणांस ठाऊक असेलच की बच्चु भाऊ सारखा नेता जो सकाळ पासुन ते रात्री पर्यंत फक्त सर्व सामान्य जनते साठी काम करतो अश्या पक्षाचे आपण पाईक आहोत असे अनिल चौधरी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले. 

गुलाब पाटील यांनी देखील आपल्या मनोगतात सागितले की, भाऊ समाज सेवांच्या माध्यमातून आम्ही देखील मोठे झालोआहोत मगील पंधरा दिवसा पुर्वी आम्ही 18 गावातील सहकार्यना घेऊन पक्षात प्रवेश केला भविष्यात प्रत्येक गावा गावात जाऊन सदस्य करून शाखेचे नियोजन केले जाईल अमळनेर दुष्काळी तालुका असुन कोरोना चे संकट आहे तरी तालुक्यातील सर्व शाळेची फी 50 %माफ करावी या साठी नामदार बच्चु भाऊ ना पुढच्या आठवड्यात भेटून मागणी करणार आहोत तरी भाऊ विद्यार्थी ची फी माफ करण्यासाठी आपण देखील सहकार्य करावे.

सदर कार्यक्रम प्रसंगी जळगाव जिल्हा अध्यक्ष विजयकुमार भोसले, भटके-विमुक्त समाजसेवक साहेबराव बागुल (बाबर)ता अध्यक्ष पंकज पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम रविंद्र पाटील उपसरपंच धार पाटील, रामचंद्र पाटील, मुडी राजेंद्र, पाटील गलवाडे, हिरामण मामा लोण, मनोज पाटील, भरवस प्रमोद पाटील धार सह अनेक सदस्यांची नोंदणी व प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. पक्षात ज्या मान्यवरांनी प्रवेश केला त्याचे गुलाब पुष्प देऊन अनिल चौधरी यांनी स्वागत केले व भविष्या साठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version