दहिगाव येथे जंतनाशक मोहीमेस प्रारंभ

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल यांचे हस्ते लाभार्थ्या बालिकेस जंतनाशक गोळी देऊन आरोग्य विभागाच्या जंतनाशक मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. ही मोहिम १ ते ८ मार्च पर्यंत राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील कृमी दोषाचे रुग्ण शून्यावर आणण्यासाठी आरोय यंत्रणेकडुन व्यापक नियोजन करून आरोग्य विभागामार्फत राज्यात व जिल्ह्यात तसेच तालुका पातळीवर दिनांक १ ते ८मार्च दरम्यान १वर्ष ते १९ वर्ष वयोगटात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवली जात आहे. जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी दिलेल्या सूचनेनुसार अंगणवाडी , प्राथमिक शाळा या सद्या स्थितीला विद्यालय व महाविद्यालय बंद असल्याने आशा सेविका यांची रॅपिड एंटीजन की द्वारे कोविड-19 चाचणी करण्यात आलेली असून अहवाल निगेटिव्ह आलेल्या आशा सेविका सॅनिटायझर चा वापर करून व सामाजिक अंतर ठेवून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष व समक्ष स्वतः १ वर्ष ते १९वर्षे वयोगटातील बालके , विद्यार्थी व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळी खाऊ घालत आहेत.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे , डॉ. नसीमा तडवी व आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांना किंवा बालकांना काही कारणामुळे आज जंतनाशक गोळी मिळाली नाही त्यांना मापअप राऊंड दि. ८ मार्च रोजी जंतनाशक गोळी दिली जाईल. तरी परिसरातील पालकांनी जंतनाशक मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन डॉ. नसीमा तडवी यांनी केले आहे.

सदरची ही जंतनाशक मोहीम यशस्वितेसाठी संजय तडवी, राजेंद्र बारी , बालाजी कोरडे, भुषण पाटील, अरविंद जाधव , अनिता नेहते, चंद्रकला चौधरी व आशा सेविका नीता महाजन , भाग्यश्री महाजन , अर्चना अडकमोल , पुष्पा पाटील व संध्या बाविस्कर हे परिश्रम घेत आहेत.

 

Protected Content